सन २०२२ मध्ये ग्रामपंचायतीने केला होता अशा प्रकारचा ठराव
सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
लांजा | प्रतिनिधी : संत तुकाराम महाराजांची प्रतिमा शासकीय कार्यालयांमध्ये लावावी या आडवली ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाबाबत कार्यवाही करताना आडवली ग्रामपंचायत कार्यालयात संत तुकाराम महाराजांची प्रतिमा लावण्यात आली. संत तुकाराम महाराज यांची हातात लेखणी असणारी प्रतिमा शासकीय कार्यालयांमध्ये लावण्यात यावी असा ठराव लांजा तालुक्यातील आडवली ग्रामपंचायतच्या वतीने ९ फेब्रुवारी २०२२ रोजी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव करण्यात आला होता. महाराष्ट्राला भूषणावह असणाऱ्या परंतु दुर्लक्षित राहिलेल्या संत तुकाराम महाराज यांचे शासन प्रशासन स्तरावर पुण्यस्मरण व्हावे यासाठी आडवली ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला होता. सन फेब्रुवारी २०२२ मध्ये अडवली ग्रामपंचायत ने केलेल्या ठरावाची शुक्रवारी 10 फेब्रुवारी २०२३ रोजी प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली.
ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश घाग यांच्या हस्ते ही प्रतिमा ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आली याप्रसंगी बोलताना सरपंच घाग म्हणाले की, संत तुकाराम महाराजांनी लिहिलेले गाथा ही केवळ गाथा नसून भारताचे पहिले संविधान आहे. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थाने त्यांची प्रतिमा ग्रामपंचायत कार्यालयात लावताना अतिशय आनंद होत असल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी सरपंच रमेश घाग यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ देवधेकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश काष्टे, ग्रामसेवक राजदीप सुवारे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच दिलीप पवार ,शंकर सुतार ,विजय शिंदे यांच्यासह अन्य ग्रामस्थ ,महिलावर्ग यावेळी उपस्थित होते. अशा प्रकारचा ठराव करून संत तुकाराम महाराजांची प्रतिमा ग्राम पंचायत कार्यालयात लावणारी तालुक्यातील आडवली ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.