लांजा | प्रतिनिधी : तालुक्यातील आरगाव येथील स्वयंभू श्री गांगेश्वर सेवा मंडळाच्या वतीने महाशिवरात्री उत्सव दिनांक १७ ते १९ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक ,सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने दिनांक १९ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय ढोल वादन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्वयंभू श्री गांगेश्वर देवस्थानचा महाशिवरात्रोत्सव हा साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने १७ फेब्रुवारी अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. दिनांक १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सकाळी नऊ ते ११ अभिषेक व दिवसभर अन्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी काल्याचे किर्तन आणि महाप्रसाद तसेच सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी रात्र जिल्हास्तरीय भव्य ढोल वादन स्पर्धा होणार आहे. गांगेश्वर वाडी आरगाव या ठिकाणी होणाऱ्या या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला रोख रुपये ११,१११ व भव्य चषक देऊन गौरवण्यात येणार आहे .द्वितीय विजेत्यांना ७७७७ व चषक आणि तृतीय विजेतांना रुपये ५५५५ व चषक अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत.
तसेच उत्कृष्ट ढोल वादक, उत्कृष्ट नृत्य सादरीकरण, उत्कृष्ट ताशा वादक अशी वैयक्तिक स्वरूपाची बक्षीस देखील देण्यात येणार आहेत.
स्पर्धेबाबत अधिक माहिती व संपर्कासाठी
नरेश खामकर अध्यक्ष – ८७६७७४७६४७,
रवींद्र खामकर सचिव ग्राम शाखा- ९४०४००३१००,
रुपेश खामकर- ९३७२०७९६५१, दीपक जाधव ९२८४८७९९५८ व अक्षय खामकर ७४९८११०२७७
यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे.
Home महाराष्ट्र रत्नागिरी आरगाव येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त १९ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय ढोल वादन स्पर्धा