भेलसई विठ्ठल रखुमाई मंदिरात सातगाव विभागातर्फे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी*

चिपळूण | प्रतिनिधी : रोहिदास समाजसेवा संघ ता. खेड अंतर्गत सातगाव विभागातर्फे भेलसई येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष दिनेश शिरीषकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष सुरेश खेडेकर उपस्थित होते.

सुरुवातीला संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर रोहिदास समाज बांधवांनी सुश्राव्य भजन गायले. यावेळी उपस्थित समाज बांधव व भगिनींनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.

यानंतर धामणदेवी ग्रामपंचायत सदस्य संदेश पेवेकर, विविध कार्यकारी सोसायटी धामणदेवी सदस्य प्रभाकर पेवेकर, उद्योजक ह. भ. प. शंकर कदम, गणेश कदम, आनंदा कदम, कु. ऐश्वर्या सावर्डेकर या सर्वांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.

तसेच सातगाव विभागातर्फे तालुका पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष दिनेश शिरीषकर, जिल्हाध्यक्ष सुरेश खेडेकर, विभागध्यक्ष संतोष सावर्डेकर, श्रीमती स्नेहा कराडकर यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी तालुका संघटक विजय सुसविरकर, सहसचिव श्रीकांत देवळेकर, सदस्य रमेश जाधव, विभाग अध्यक्ष संतोष सावर्डेकर, उपाध्यक्ष प्रभाकर पेवेकर, ह. भ. प. शंकर कदम, सचिव उमेश कराडकर, सहसचिव संजीवन कदम, संघटक रुपेश मासवकर, सहसंघटक मोहन कराडकर, खजिनदार गणेश कदम, सहखजिनदार प्रकाश पेवेकर, कार्याध्यक्ष बळीराम कराडकर, सल्लागारपदी रामदास कराडकर, अनंत कदम, चंद्रकांत पेवेकर सदस्यपदी दत्ताराम कराडकर, सुजय कराडकर, सुनील कदम, संतोष कदम, महेश कदम, संतोष पेवेकर, सोनू पेवेकर, शंकर सावर्डेकर, रवींद्र मासवकर, निमंत्रक म्हणून यश कराडकर, भिवराम कराडकर, हरिश्चंद्र कराडकर, आनंदा कदम, सुरेश कदम, ह. भ. प. श्री. कदम, श्रीधर पेवेकर, दिनेश आंबडसकर, सोनू पेवेकर, मोतीराम आंबडसकर, संतोष पेवेकर, मारुती कदम, शांताराम कदम, आशिष कदम, आशिष शंकर कदम, सौ. तारामती कराडकर, सौ. ललिता कराडकर, सौ. लक्ष्मी कराडकर, सौ. अनिता कदम, सौ. सुनिता कदम, सौ. अश्विनी कदम, प्रतिभा पेवेकर, सौ. वनिता पेवेकर, सौ. श्वेता सावर्डेकर, सौ. प्रियांका सावर्डेकर, सौ. रूपाली मासवकर आदी समाज बांधव व भगिनी उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन रुपेश मासवकर व आभार उमेश कराडकर यांनी मानले.