पालीमध्ये भव्य डे नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

वार्ताहर | पाली : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व रत्नसिंधु योजना सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत पुरस्कृत व बाळासाहेबांची शिवसेना शाखा पाली,पाथरट,युवासेना व युवा प्रतिष्ठान पाली यांच्यातर्फे पाली येथे भव्य दे नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन दिनांक १८ ते २० फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा पाली पंचक्रोशी मर्यादित आहे. या स्पर्धा वळके रोड वरील पाली हेलिपॅड मैदानावर संपन्न होणार आहेत. विजेता संघाला रुपये ५५,५५५ व चषक तसेच उपविजेता संघाला रुपये ३३,३३३ व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच सामनावीर, मालिकाविर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज व इतर बक्षीसही खेळाडूंना देण्यात येणार आहे. अधिक माहिती करिता अतुल सावंत ९४०४१६०३३४,सौरभ खाके ७२७६१८१९२,समीर गराटे ९८३४२१३२३७,ओशो सावंत ८६००६८२७२९ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.