रत्नागिरी | प्रतिनिधी : मराठी पत्रकार परिषदेची तालुका कार्यकारिणीची सभा नुकतीच जयस्तंभ येथील पत्रकार कक्षात संपन्न झाली. या सभेत रत्नागिरी तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषदेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेच्या प्रारंभीच निर्भिड पत्रकार कै.शशिकांत वारिशे यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी तीव्र निषेध करून दोन मिनिटांचा मौन धारण करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. दरम्यान याचवेळी रत्नागिरी तालुका पत्रकार कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये दैनिक रत्नागिरी टाईम्सचे पत्रकार प्रशांत पवार यांच्यावर तालुका अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी दैनिक नवराष्ट्रचे सतिश पालकर, तालुका कार्याध्यक्षपदी झी न्युजचे प्रणव पोळेकर यांची तर सचिवपदी दैनिक रत्नागिरी एक्सप्रेसचे जमीर खलफे यांची फेरनिवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचे राज्य व जिल्हा कार्यकारिणीकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी परिषदेचे राज्य उपाध्यक्ष जान्हवी पाटील, माजी जिल्हाध्यक्ष हेमंत वणजू, सोशल मिडीया अध्यक्ष मुश्ताक खान, कार्याध्यक्ष राजेश शेळके, सौरभ मलुष्टे, रहिम दलाल, समीर शिगवण, मुझम्मील काझी, अमोल डोंगरे आदी उपस्थित होते.
Home महाराष्ट्र रत्नागिरी मराठी पत्रकार परिषद तालुकाध्यक्षपदी प्रशांत पवार, सचिवपदी जमीर खलफे यांची फेरनिवड