१७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी रोजी साजरे होणार कार्यक्रम
पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी – पाटपन्हाळे येथील श्री निळकंठेश्वर देवस्थान संस्थेतर्फे शुक्रवारी १७ फेब्रुवारी ते रविवारी १९ फेब्रुवारी २०२३ या तीन दिवसांच्या कालावधीत महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.श्रीं ची शोडषोपचार पूजा , शिवलीलामृत ग्रंथ सामुदायिक पारायण , भजन , हरिपाठ, कीर्तन महाप्रसाद लघु रुद्र अभिषेक महाआरती व प्रसाद , प्रवचन , दिंडी सोहळा वारकरी संप्रदाय , पालखी मिरवणूक , ओम नमः शिवाय नामजप , प्रसाद वाटप , सत्यनारायण महापूजा , महाप्रसाद असे विविध कार्यक्रम महाशिवरात्री उत्सवानिमित्त साजरे होणार आहेत.श्री निळकंठेश्वर देवस्थान संस्थेतर्फे आयोजित केलेल्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त शुक्रवारी १७ फेब्रुवारी २०२३ रोजी श्रींची शोडषोपचार पूजा, श्री शिवलीलामृत ग्रंथ सामुदायिक पारायण , प.पू.कलावती आईंचे भजन, हरिपाठ , ह.भ.प.श्री.बबनमहाराज कुंभार वचनवाडी वेळंब यांचे कीर्तन , रात्री ९.०० वा. नंतर महाप्रसाद असे कार्यक्रम साजरे होणार आहेत .शनिवारी १८ फेब्रुवारी २०२३ रोजी श्रींची शोडषोपचार पूजा , लघुरुद्र अभिषेक , महाआरती व प्रसाद , प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्यातर्फे व्यसनमुक्ती व तणावमुक्ती या विषयाबाबत प्रवचन , प.पू.कलावती आईंचे भजन, श्री व्याडेश्वर दिंडी सेवा मंडळ गुहागर यांचा दिंडी सोहळा श्री वाडेश्वर दिंडी सेवा मंडळ यांच्यातर्फे दिंडी सोहळा व हरिपाठ , ह.भ.प.श्री. साहील महाराज शेख पुणे यांचे कीर्तन , रात्री ११.०० वा.नंतर श्रींची पालखी मिरवणूक व रात्री १२.०० वा.नंतर ओम नमः शिवाय नामजप व प्रसाद वाटप असे कार्यक्रम साजरे होणार आहेत. रविवारी १९ फेब्रुवारी २०२३ रोजी श्रींची शोडषोपचार पूजा , श्रीसत्यनारायणाची महापूजा , आरती व महाप्रसाद , प.पू.कलावती आईचे भजन , वारकरी सांप्रदायतर्फे हरिपाठ , ह.भ.प.नारायणमहाराज पवार यांचे कीर्तन व रात्री ९.०० वा. नंतर उत्सवाची सांगता , पसायदान व प्रसाद अशा विविध कार्यक्रमाने महाशिवरात्री उत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे . सदरच्या आयोजित महाशिवरात्री उत्सव कार्यक्रमांसाठी व आनंदी सोहळ्यासाठी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन श्री निळकंठेश्वर देवस्थान शृंगारतळी – पाटपन्हाळेतर्फे करण्यात आले आहे.