जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करणार
माडखोल प्रभागाची हिरकणी प्रभागसंघ वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
सावंतवाडी । प्रतिनिधी :
माडखोल प्रभागातील ९ प्रभागांचे कार्य हे इतर महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. बचत गटांच्या माध्यमातून विविध लहान मोठ्या उद्योग व्यवसायांमधून महिला आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यास मदत करीत आहेत. हे पाहता खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण सुरू झाल्याचे दिसून येते. मागील पाच वर्षाची परिस्थिती लक्षात घेता त्यांच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत प्रकर्षाने जाणवत असून महिलांची होत असलेली प्रगती पाहता त्यांना आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी त्यांच्या उद्योग व्यवसायांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वतोपरी आर्थिक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांनी दिली.
सावंतवाडी तालुक्यातील माडखोल प्रभागाची हिरकणी प्रभागसंघ वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या महिलांना मार्गदर्शन करताना रवींद्र मडगावकर यांनी महिलांच्या झालेल्या एकंदरीतच प्रगती बाबत गौरवोद्गार काढले.क्या प्रभागातील महिलांची एकजूट पाहता भविष्यात या महिला अधिक मोठ्या उद्योगांमध्ये झेप घेऊन या भागात मोठी आर्थिक संपन्नता येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी अधक्षा सौ.आकांक्षा अभय किनळोसकर, सचिव सौ.माधुरी गिरीधर चव्हाण, कोषाध्यक्ष सौ मिनल महादेव जंगम, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, माडखोल प्रभागातील सरपंच ,बॅकेंचे अधिकारी रोडी, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, तालुका अभियान कक्ष अधिकारी स्वाती रेडकर, ठाकरे, गावंडे, सौ रिदीमा पाटकर तसेच इतर प्रभागातील सिसी उपस्थित होते.
माडखोल प्रभाग समन्वयक कुंवरसिंग पाडवी यांच्या नियोजनखाली वार्षिक सर्वसाधारण सभा व्यवस्थितरीत्या पार पडली.
यावेळी तब्बल १४६५ महिला उपस्थित होत्या. यावेळी रवींद्र मडगावकर यांच्यासह माजी जि प सदस्य पंढरीनाथ राऊळ तसेच गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण व अन्य अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
फोटो – माडखोल प्रभाग हिरकणी प्रभागसंघ वार्षिक सभेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर सोबत माजी जि.प. सदस्य पंढरीनाथ राऊळ, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, आकांक्षा किनळोसकर, माधुरी चव्हाण, वर्षा मडगावकर, मिनल जंगम व अन्य ( सचिन रेडकर )
Sindhudurg