पत्रकार वारीशे मृत्यु प्रकरणी आरोपी पंढरीनाथ आंबेरकरच्या पोलीस कोठडी दोन दिवसाची वाढ

 

राजापूर |प्रतिनिधी : पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघातील मृत्युपकरणी पोलिस कोठडीत असलेल्या संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. 16 फेब्रुवारी पर्यत त्याची पोलीस कोठडी वाढवीण्यात आली आहे. तशी माहीती राजापूर पोलीसांनी दिली आहे.

राजापूर तालुक्यातील कशेळी येथील पत्रकार शशिकांत वारीशे सोमवार दि.6 फेब्रुवारी रोजी राजापूर पेट्रोल पंपातून दुचाकीमध्ये पेट्रोल भरून बाहेर पडत असताना समोरून येणाऱया थार गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये वारीशे गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वारीशे यांच्या नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपात असल्याची तकार पोलीस स्थानकात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी थार चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली होते. त्यानंतर राजापूर न्यायालयाने त्याला दि.14 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी 14 रोजी त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी आंबेरकर याला मंगळवारी सायंकाळी राजापूर दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आंबेरकर याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. या प्रकरणी रत्नागिरी उपविभागीय अधिकारी तपास करत आहेत.