गजनृत्य सादर करत धनगर बांधवांनी केले जंगी स्वागत
वैभववाडी : नरेंद्र कोलते
सडूरे तांबळघाटी धनगरवाडीला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी भेट दिली. यावेळी तांबळघाटी धनगर समाजाच्या वतीने ढोल थाळीच्या गजरात गजनृत सादर करत पारंपारिक पद्धतीने श्री.नायर यांचे स्वागत केले.
यावेळी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, ग्रामविस्तारधिकारी लक्ष्मण हाडे, प्रकाश अडुळकर, सरपंच दीपक चव्हाण, अरुळे सरपंच मानसी रावराणे, उपसरपंच अंनत जंगम, उपसरपंच रमेश वारीक, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, प्रियंका पाटील, विशाखा काळे, माजी सभापती अंबाजी हुबे, वकील अजितसिहं काळे, मधुकर कोकरे, सुर्यकांत बोडके, धनगर समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.