संतोष कुळे | चिपळूण : तालुक्यातील आबीटगावचे सुपुत्र आणि गेले अनेक वर्ष नमन लोक्कलेतून रसिकांची मने जिंकणारे व संगीताची जाण असणारे संजय उर्फ बाबा भागडे यांना कोकण व्हिजन फाउंडेशन, कोकण रिपोर्टर आणि सह्याद्री समाचार न्यूज चॅनेल यांच्या वतीने “लोककला भूषण पुरस्कार 2023” या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा रविवार 5 मार्च रोजी सकाळी १० वाजता लक्ष्मीबाई बांदल हायस्कूल येथे होणार आहे. संजय भागडे हे गेले अनेक वर्ष नमन या कलेतून रसिकांचे मनोरंजन करत आहेत .नवविकास नमन मंडळ आबीटगाव दत्तवाडी या नमन मंडळाचे ते उत्तम सर्वेश्वरा आहेत. गतवर्षी याच नमन मंडळांनी डिसेंबर ते मे या महिन्यादरम्यान 69 प्रयोग केले होते .याही वर्षी नमन मंडळ आघाडी वरती आहे. याच नमनातील आधारस्तंभ संजय भागडे हे नमन आणि संगीत या क्षेत्रातून सर्व परिचित आहेत आतापर्यंत केलेल्या लोककलेच्या सेवेची दखल घेत कोकण व्हिजन फाउंडेशन, कोकण रिपोर्टर आणि सह्याद्री समाचार यांनी त्यांची लोककला भूषण पुरस्कार 202३ साठी निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल लोककलावंतांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. चिपळूण तालुका नमन भारुड लोककला मंडळ, नमन लोककला मंडळ रत्नागिरी जिल्हा आणि कुणबी युवा चिपळूण यांच्या वतीने संजय भागडे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.