चिपळूण | वार्ताहर : तालुक्यातील श्री भैरी देवी मित्र मंडळ देऊळवाडी नारदखेरकी यांच्या वतीने महाशिवरात्री उत्सव व पाचवा वर्धापन दिन सोहळा दिनांक 18 फेब्रुवारी पासून आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.शुक्रवार 17 व १८ रोजी क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले आहेत .त्यानंतर शनिवार 18 रोजी सकाळी १० वाजता महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाला प्रारंभ होऊन प्रथम अभिषेक समारंभ, सकाळी 11 वाजता दिंडी श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ गोंधळी ओमली, सायंकाळी ७ ते ९ वाजता ह भ प गणेश महाराज पवार अनारी यांचे कीर्तन, रात्री १० ते १२ वाजता मुलांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानंतर दिनांक रविवारी 19 रोजी रात्री १०.३० वाजता श्री भैरी देवी नाट्य मंडळ देऊळवाडी हे नमन सादर करणार आहेत .या महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे