समर्थ रामदास स्वामींचे साहित्य आचरणात आणा :सचिन साठे

माखजन | वार्ताहर : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.सगळ्याच संतांची श्रेष्ठता आहेच.पण रामदास स्वामींनी संपूर्ण जीवनाच सार सांगितलंय.मनाचे श्लोक ,दासबोध हे पूजनीय,वंदनीय च नव्हे तर सकळ जनानी आचरणात आणावेत असे आहेत.समर्थ रामदास स्वामींचे साहित्य प्रत्येकाने आचरणात आणावे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार सचिन साठे यांनी केले.ते माखजन इंग्लिश स्कूल मध्ये,दासनवमी निमित्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ संत आहेत. समर्थ रामदास स्वामींनी मानवी चंचल मनाला स्थिर करण्यासाठी एका रात्रीत २०५ श्लोक लिहिले.हे कार्य अजोड आहे.ह्या सगळ्या श्लोकांमध्ये जीवनाच सार दडलंय.ते पाठ करून त्याचा अर्थ समजून घेतला तर जीवन समृद्ध होईल असा विश्वास व्यक्त केला.साठे पुढे म्हणाले की जी व्यक्ती चांगल ऐकू शकते तिच व्यक्ती चांगली कृती करू शकते.
विद्यार्थ्यांनी शरीर संपदा मिळवली पाहिजे.त्या साठी सूर्यनमस्कार घाला असा सल्ला दिला.
कार्यक्रमादरम्यान प्रशालेत गुरुकुल पूरक उपक्रमांतर्गत सचिन साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या ५१ हजार सूर्यनमस्कारांच्या संकल्पाची पूर्ती झाली.यानिमित्त विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.त्याचप्रमाणे ट्रस्ट च्या बक्षीसांचे वितरण झाले.यावेळी मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर यांनी प्रस्ताविक केले.सूत्रसंचालन जगदीश जाधव व रवींद्र पवार यांनी केले.तर आभार सौ कांचन जंगम यांनी मानले.