मळगाव येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव मधील भिल्लवाडी ग्रुप व शिवप्रेमी ग्रामस्थ यांच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त ‘सार्वजनिक शिवजयंती उत्सव ‘ साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात पहाटे ५ वाजता फुकेरी हनुमंत गड ते मळगाव पर्यंत मशाल रॅली, सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर अभिषेक, दुपारी २.३० ते ४.३० मोटर सायकल रॅली व ढोल ताशा पथक, सायंकाळी ५ वाजता मर्दानी खेळ, लेझीम नृत्य, वेशभूषा व नृत्यादी कार्यक्रम, सायंकाळी ६.३० वाजता प्रमुख उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषण, ७.३० वाजता स्नेहभोजन तर रात्री सुयोग कलामंच करमळी गोवा यांचा ‘शिव आलिंगन ‘ हा ऐतिहासिक नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन भिलवाडी ग्रुप व मळगाव ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.