आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्ष ताकतीने उतरणार : शेखर माने

Google search engine
Google search engine

सावंतवाडीत ‘राष्ट्रवादी चषक २०२२’ चा शुभारंभ

सावंतवाडी । प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत कोणतीही गटबाजी नसून सर्वाची मन एकच आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने उतरणार असून त्यासाठीच्या संघटना बांधणीस सुरूवात झाली आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी व्यक्त केले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत रविवारी राष्ट्रवादी पक्षाची बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणी आढावा यावेळी घेण्यात आला आहे. येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपरिषद निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणीही या बैठकीत पार पडली.

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी मोठ्या ताकदीने निवडणूकांत उतरणार असून पक्षाच्या महत्वाच्या पदावर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना देखील निवडणूक लढवण बंधनकारक राहणार आहे असं मत सिंधुदुर्ग निरीक्षक शेखर माने यांनी व्यक्त केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत कोणतीही गटबाजी नसून सर्वाची मन एकच आहेत, पक्षात मनभेद नसून कुठलीही गटबाजी नाही. आगामी निवडणुकांत महाविकास आघाडी म्हणून लढविण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहे. तसा निर्णय झाला तर महा आघाडी करून आम्ही निवडणूका लढणार असल्याचे श्री. माने म्हणाले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, शिवसेना वैभव नाईक यांच्यावर झालेल्या अँटी करप्शन चौकशीच्या विरूद्ध निघणाऱ्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील सहभागी होणार असून पूर्णपणे वैभव नाईक यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक शेखर माने जिल्हा दौऱ्यावर असून सकाळी सावंतवाडी तालुक्यात ‘राष्ट्रवादी चषक २०२२’ चा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आले.

कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून हा ‘राष्ट्रवादी चषक’ भरविण्यात आला आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात क्रिकेट चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी देत या स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे अस आवाहन केले.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, ज्येष्ठ नेते काका कुडाळकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, प्रफुल्ल सुद्रिक, रेवती राणे, चित्रा देसाई, सावली पाटकर, भास्कर परब आदी उपस्थित होते.

Sindhudurg