मसुरे | झुंजार पेडणेकर : मुणगे ग्रामपंचायत प्रभाग एकच्या सदस्य सौ रविना मालाडकर यांनी २ वर्ष कार्यकाल यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे औचित्य साधून कारीवणे वाडीतील शाळेतील विध्यार्थीना भेटवस्तू व खाऊ वाटप करण्यात आले.प्रभागातील विकास कामांबरोबर सामाजिक कार्य करत असताना मागील दोन वर्षात अनेक समाज उपयोगी, शैक्षणिक, महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, आरोग्य केंद्र, आजारी रुग्णांना अर्थसहाय्य अशा अनेक उपक्रमातून कार्यक्रम राबविल्याचे सौ मालाडकर यांनी सांगितले. यावेळी आपई वाडी आणि कारीवणेवाडी मधील अंगणवाडी केंद्र आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ, भेटवस्तू वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी यशस्वी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. आनंद मालाडकर यांनी सहकार्य केले.स्थानिक प्रभागसेविका सौ रवीना मालाडकर, सदस्य सौ अंजली सावंत, माजी उपसरपंच श्री.धर्माजी आडकर, माजी सरपंच सौ. सायली बागवे आणि शालेय पालक समिती अध्यक्षा देऊळवाडी सौ.अनुजा कारेकर शाळेतील शिक्षक या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.