संतोष मर्गज यांच्या ‘रिमझिम पाऊसधारा” व्हिडीओ आजपासून चाहत्यांच्या भेटीला

Google search engine
Google search engine

मुंबई : कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावचे सुपुत्र कवी, पत्रकार संतोष मर्गज यांच्या रिमझिम पाऊसधारा प्रेमगीत व्हिडीओ व्हॅलेंटाइन् डे दिवशी चाहत्यांच्या भेटीला आला. या गाण्याचे गीत संगीत संतोष मार्गज यांचे असुन संगीत संयोजन राजेश- सिद्धांत यांचे आहे. प्रेमगीताचे गायन कु. तेजस पवार याने केले असून आदित्य आणि विशाखा, या जोडीचा पावसातील प्रेमाचा आनंद चाहत्यांसाठी सादर केला आहे. स्नेहादित्य प्रॉडक्शन मुंबई यांची निर्मिती असून संतोष सावंत यांच्या दिग्दर्शनातून हे गीत प्रचंड प्रतिसादात मुंबईमध्ये रिलीज झाले.