श्रीकृष्ण सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी : वाचन संस्कृतीत सातत्याने वाढ व्हावी या महत्वाकांशी उद्देशाने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन श्रीकृष्ण सार्वजनिक वाचनालय कारिवडे यांच्या वतीने साजरा करण्यात आला.


पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक असेल तरी ते विकासाचे उत्तम साधन आहे.आपला विकास करायचा असेल तर ग्रंथाला मित्र बनविणे गरजेचे आहे.जीवनाचा खरा अर्थ व खरा आनंद मिळविण्यासाठी चांगल्या पुस्तकाचे वाचन करावे या बाबत मार्गदर्शन कारिवडे देवस्थान समितीचे सचिव दत्ताराम गावडे यानी केले.गावातील समृद्ध ग्रंथालये हि समाज परिवर्तनाची दिशा आहे.हि दिशा ठरविण्यासाठी चांगले वाचक तयार करणे काळाची गरज आहे असे मत श्रीकृष्ण सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष भालचंद्र भारमल यानी मांडले.


यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच या दिनाचे औचित्य साधुन मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून कारिवडे पेडवेवाडी या शाळेतील मुलांचे प्रकट वाचन घेऊन मुलांचे अभिनंदन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले.स्वागत आणि आभार अध्यक्ष भालचंद्र भारमल यानी मानले.

Sindhudurg