सखी वन स्टॉप सेंटरचा व्दितीय वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा

Google search engine
Google search engine

रत्नागिरी: सखी वन स्टॉप सेंटरचा व्दितीय वर्धापन दिन सोहळा काल साजरा करण्यात आला. सखी वन स्टॉप सेंटर हा उपक्रम केंद्र शासन पुरस्कृत जिल्हा महिला व बाल विकास विभाग मान्यताप्राप्त व भाकर सेवा संस्था संचलित यांच्या मार्फत राबविला जातो.

या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट महिलांना सर्व सुविधा एकाच छताखाली विनामूल्य पुरविणे हे आहे. सखी सेंटर सुरु होवून आज २ वर्ष पूर्ण झाले व या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक मा. डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मा. श्री. आर. बी. काटकर, सखी व्यवस्थापन समिती अशासकीय सदस्य श्री. जान्हवी पाटील, बाल न्याय मंडळ सदस्या श्रीमती विनया घाग, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमती आदिती राउळ, भाकर सेवा संस्थेचे संस्थापक श्री. देवेंद्र पाटील तसेच संचालक श्री. पवनकुमार मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.

सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्राप्रशासक श्रीमती अश्विनी मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सखी सेंटरच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. सखी वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरीतील विविध शाळांमधून व महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांच्या पोस्टर मेकिंग व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांसाठी मोबाईल फोन चे व्यसन व हिंसाचार मुक्त परिवार हे दोन विषय देण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला त्यामधून दोन गटांमध्ये प्रथम ३ क्रमांक व उत्तेजनार्थ असे क्रमांक काढण्यात आले. त्याचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. त्यामध्ये गट क्र. १ निबंध स्पर्धेमध्ये कु. माही वनकर प्रथम क्रमांक, कु. श्रेया मोरे व्दितीय क्रमांक, कु. स्निग्धा भोळे तृतीय क्रमांक व कु. रिया वेलोंडे उत्तेजनार्थ. गट क्र. २ कु. पायल कासेकर प्रथम क्रमांक, कु. आसिया अत्तरवाले व्दितीय क्रमांक, कु. साहिल बारे तृतीय क्रमांक व कु. रिद्धी नागवेकर उत्तेजनार्थ. त्याचप्रमाणे गट क्र. १ पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये कु. मृगजा जुवेकर प्रथम क्रमांक, कु. अपूर्वा गावडे व्दितीय क्रमांक, कु. श्रुती बोरकर तृतीय क्रमांक व कु. प्रथम शिंदे उत्तेजनार्थ तसेच गट क्र. २ कु. साहिल मोवळे प्रथम क्रमांक, कु. इशिका बाईंग व्दितीय क्रमांक, कु. आशिष बाईत तृतीय क्रमांक व कु. कस्तुरी गुरव उत्तेजनार्थ असे क्रमांक काढण्यात आले.

याचबरोबर समाजामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांसाठी सखी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ग्रामजीवन आधार संस्था तसेच श्रीमती शिरीषा मयेकर, नेत्रा राजेशिर्के, निहा साळवी, ऐश्वर्या विचारे, दीपलक्ष्मी माणगावकर, मुक्ता भोसले, कोमल कदम, डॉ. पल्लवी गद्रे, अॅड. विनया घाग, रेश्मा आवटी, अर्चिता रबसे, संपदा सावंत, अॅड. अकल्पिता चक्रदेव, जया कांबळे, पूजा अलकुटे, शिवानी पाटील, मोहिनी मिरवणकर, साक्षी कळंबटे, दीक्षिता मयेकर, अॅड. खादिजा प्रधान, खातू, शोभना कांबळे यांना सखी सन्मान देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व सखीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच भाकर सेवा संस्थेचे संस्थापक श्री. देवेंद्र पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सखीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सखी सेंटरचे पोलिस सुलभता अधिकारी श्री. मोहन पाटील यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.