उंबर्डे ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांची घेतली भेट

प्रलंबित विकास कामाबाबत केली चर्चा

वैभववाडी | प्रतिनिधी : उंबर्डे गावच्या विविध प्रलंबित विकास कामाबाबत ग्रामपंचायत सदस्य काशिम रमदुल यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेत चर्चा केली. गावातील सर्व प्रलंबित विकास कामे तात्काळ मार्गी लावणार असे आश्वासन आ. नितेश राणे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. यावेळी हाजी अब्दुल नाचरे, दस्तगीर रमदुल, हसन मुकादम, नतू रमदुल, हुसेन बोबडे, समीर लाजेकर, मन्सूर रमदुल ग्रामस्थ उपस्थित होते.