निवृत्त पोलीस विजय पवार यांनी वयाच्या 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Google search engine
Google search engine

 

रत्नागिरी |  प्रतिनिधी :रत्नागिरी पोलीस दलातील निवृत्त पोलीस विलास पवार यांचे बुधवारी 15 फेब्रुवारी रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. तीन वर्षापूर्वीच रत्नागिरी पोलीस दलातून निवृत्त झाले.

पोलीस दलात एक मनमिळावू वृत्तीचा स्वभाव असणारा पोलीस म्हणून विजय पवार यांची ओळख होती. विजय पवार यांनी जवळपास 37 वर्षे रत्नागिरी पोलीस दलात सेवा बजावली. यामधील पाच वर्ष रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यामधून सेवा केली. आपल्या हक्काचा माणूस अशी सर्वत्र त्यांची ओळख होती. 2020 काळात राजापुर पोलीस ठाण्यात ते निवृत्त झाले. दरम्यान, विजय पवार यांच्या निधनामुळे लांजा तालुक्यासह गोळवशी वासियांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक पोलीस मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.