मालगुंड एज्युकेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार श्रद्धा बोडेकरना जाहीर

Google search engine
Google search engine

रत्नागिरी : मालगुंड एज्युकेशन सोसायटी रत्नागिरी च्या वतीने कै. सदानंद बळीराम परकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा श्रद्धा राजन बोडेकर यांना जाहीर झाला आहे. सोसायटीतर्फे दरवर्षी नेहमीच्या जबाबदरीव्यतिरिक्त वेगळे काम करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो.
सौ. श्रद्धा बोडेकर या रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक सांस्कृतिक, साहित्य आशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. श्रद्धा बोडेकर यांनी सातत्याने महिलांच्या विषयी विविधांगी लेखन केले आहे. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो.
18 फेबुवारी रोजी मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयातील सभागृहात संस्था पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तसेच रत्नागिरीचे पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कारा बददल भारत शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.