रत्नागिरी : प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानअंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई या कार्यालयामार्फत प्राप्त उद्दिष्टानुसार व प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरीता जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापना, उद्योगसमूह, शासकीय संस्था, शासकीय/खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये व व्यवसायिक प्रशिक्षण संस्था यांनी प्राध्यान्याने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी इनुजा शेख यांनी केले आहे.
या योजनेत सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या संस्थानी अधिक माहितीसाठी – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आवार नाचणे रोड रत्नागिरी (दूरध्वनी : ०२३५२-२९९३८५) येथे संपर्क साधावा.