गवळीवाडी ग्रामस्थांचे एम. एस. इ. बी ला ट्रान्सफॉर्मर साठी निवेदन

Google search engine
Google search engine

 

ओटवणे(प्रतिनीधी) ओटवणे गवळीवाडी ग्रामस्थाना सतावत असणाऱ्या वीज समस्येबाबत ग्रामस्थांनीही एम. ए. सी. बी. सावंतवाडी उपविभागीय कार्यालयात ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण यांच्या मार्गदर्शनाखाली विजेच्या होत असणाऱ्या गैरसोई बाबत निवेदन दिले. या निवेदनात ग्रामस्थानी समस्या मांडताना सध्या वीज पुरवठा होत असणारा ट्रान्सफॉर्मर खूप जुना असून सध्या या ट्रान्सफॉर्मर वर वीज वापर कर्त्यांची संख्या ही वाढली असून पूर्वीपेक्षा जास्त ग्राहक याचा वापर करत असल्याने हवा तसा विद्युत पुरवठा होत नसून उपकरणे जळणे, वारंवार फ्यूज उडणे, उपकरणे सुरु होण्यात वारंवार होणाऱ्य अडचणी याची दखल घेत योग्य ती कार्यवाही करावी किंव्हा जुना झालेला कमी पॉवर असणारा हा ट्रान्सफॉर्मर बदलून त्या जागी नवा ट्रान्सफॉर्मर बदलून मिळावा अशी मागणी गवळीवाडी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.