कुडाळ शहरातील कुटुंबांची माहिती गोळा करायला येणाऱ्यांना सहकार्य करा:- मुख्याधिकारी

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ शहराचा अद्ययावत नकाशा तयार करण्याचा असून शहरातील परिवारांची माहिती गोळा करावयात येणार आहे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी केले आहे.

भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून कळविल्याप्रमाणे कुडाळ शहराचा अद्ययावत नकाशा तयार करण्याचा असून शहरातील परिवारांची माहिती गोळा करावयाची आहे. या देशव्यापी सर्वेक्षणासाठी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी श्री. शुभम घाटगे हे फेब्रुवारी 2023 या महिन्यापासून आपल्या कुडाळ शहराला भेट देणार आहेत. तरी शहरातील सर्व प्रभागातील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सदर सर्वेक्षणावेळी त्यांना माहिती देऊन योग्य ते सहकार्य करण्यात यावे. असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी केले आहे.