सावंतवाडी हौशी कला क्रीडा मंडळाचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी तालुका हौशी कला क्रीडा क्रिकेट मंडळाच्यावतीने ४५ वर्षांवरील खेळाडूंसाठी ‘ लेदर बॉल क्रिकेट स्पर्धे ‘चे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर १७,१८ व १९ फेब्रुवारी अशी तीन दिवस ही स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेमध्ये कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ व वेंगुर्ला तालुक्यातील ज्येष्ठ क्रिकेटपटूंचे संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा मर्यादित ८ षटकांची राहणार असून दिवसभरामध्ये पाच सामने होणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार १७ रोजी सकाळी ८.३० वाजता होणार आहे. तरी सर्व क्रिकेट प्रेमींनी जिमखाना मैदानावर उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका हौशी क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष प्रा. शरद शिरोडकर यांनी केले आहे.
Sindhudurg