राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी संघाची उत्तम कामगिरी

Google search engine
Google search engine

रत्नागिरी : राज्यस्तरीय कॅडेट स्पर्धेत रत्नागिरीच्या मुलांनी चमकदार कामगिरी केली आहे. 12 ते 14 फेब्रुवारी 23 रोजी वर्धा इथे राज्यस्तरीय 5 व्या तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीतून गणराज तायक्वांदो क्लबची त्रिशा मयेकर आणि एसआरके तायक्वांदो क्लबचे सार्थक चव्हाण,आदीष्टी काळे सहभागी झाले होते. यातील त्रिशा मयेकर हिला सुवर्णपदक , सार्थक चव्हाण याला रौप्य तर आदीष्टी काळे हिला कांस्य पदक मिळाले. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने तायक्वांदो स्पोर्ट असोसिएशन, नाचणगाव, देवळी, वर्धा आयोजित ही स्पर्धा लक्ष्मी सेलिब्रेशन हॉल, फुलगाव, वर्धा इथे ही स्पर्धा झाली.स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचे राज्य संघटनेचे अध्यक्ष अविनाश बारगोजे, उपाध्यक्ष विनायक गायकवाड आणि धुलीचंद मेश्राम, अतिरिक्त उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, महासचिव मिलिंद पाठारे, सचिव सुभाष पाटील, खजिनदार व्यंकटेश कररा मिलिंद भागवत यांनी अभिनंदन केले. या खेळाडूंना एस आरके तायक्वांदो क्लबचे शाहरुख शेख तसंच गणराज तायक्वांदो क्लबचे प्रशांत मकवाना, यांचं मार्गदर्शन लाभल.