तालुकास्तरीय चित्रकला व वकृत्व स्पर्धेला भेडशीत उस्फुर्त प्रतिसादतालुकास्तरीय चित्रकला व वकृत्व स्पर्धेला भेडशीत उस्फुर्त प्रतिसाद

दोडामार्ग | सुहास देसाई ;
माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय उद्योग मंत्री ना.नारायणराव राणे साहेब यांच्या संकल्पनेतून शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व व चित्रकला स्पर्धासाठी दोडामार्ग तालुक्यात साटेली
भेडशीत वकृत्च व चित्रकला स्पर्धा भेडशी इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे
दोडामार्ग तालुक्यातील विविध प्रशालेतील शेकडो विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला.
भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी रमेश दळवी भेडशी हायस्कूलच्या मुख्याध्यापक नंदकुमार नाईक, शिक्षक संघटना अध्यक्ष दीपक दळवी राजाराम फर्जंद अमित कर्पे सतीश धरणे, कुडासे हायस्कुल मुख्याध्यापिका,गोधळी सर, हनुमंत सावंत यांसह विविध शाळांचे, मराठी विषयाचे शिक्षक उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. सतीश धर्णे, व नंदकुमार नाईक यांनी काम पाहिले.