अभाविपच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरीत होणार भव्य “Youth Summit”

Google search engine
Google search engine

 

रत्नागिरी | प्रतिनिधी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमृत महोत्सवी वर्षात विदयार्थी परिषदेच्या माध्यमातून महाविद्यालय स्तर ते राष्ट्रीय स्तरापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या २८ फेब्रुवारीला रत्नागिरीमध्ये ही अश्याच प्रकारच्या एका भव्य Youth Summit चे आयोजन करण्यात येत आहे. हे Youth Summit agenda to transform konkan या थीम वर आधारित आहे. कोंकणातील व्यावसायिकता, Start-ups, Role of youth in democracy, नविन शैक्षणिक धोरण, कोंकणातील शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी अश्या विषयांवर नामवंत वक्त्यांची यात सत्र ही होणार आहेत.

रत्नागिरी जिल्हयात प्रथमच एका मोठ्या संमेलनाचे आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केले आहे. जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा व राजापूर तालुक्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची यात उपस्थिती असणार आहे. येत्या २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९:३० ते ४:०० या वेळेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या परिसरात हा कार्यक्रम पार पडणा असून उदयोन्मुख तरुण पिढीला हा निश्चितच प्रेरणादायी ठरणारा कार्यक्रम असणार आहे.

दिनांक १२ फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाच्या पोस्टरचे अनावरण रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा व स्वागत समिती अध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, स्वागत समिती उपाध्यक्ष सुरेशशेठ गुंदेचा, अभाविप कोंकण प्रदेश अध्यक्ष प्रा. श्रीकांत दुदगिकर आणि स्वागत समिती तसेच संचालन समिती सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी स्वागत समिती देखील तयार करण्यात आली आहे व ती पुढीप्रमाणे आहे, स्वागत समिती अध्यक्ष – शिल्पाताई पटवर्धन, स्वागत समिती उपाध्यक्ष – सुरेशशेठ गुंदेचा, डॉ. निलेश नाफडे, वैभव सरदेसाई, स्वागत समिती सचिव – विश्वास वाडेकर, स्वागत समिती सहसचिव – ऍड. महेंद्र मांडवकर, स्वागत समिती सदस्य – सदानंद भागवत, सीए. मंदार गाडगीळ, हृषिकेश पटवर्धन, ऍड. प्रिया लोवलेकर, सीए. वरदराज पंडित, डॉ. श्रीधर ठाकूर, हेरंब जोगळेकर, ऍड. सुशांत पवार, विनायक जोशी, संजय गांधी, संदिप गानु, प्रशांत डिंगणकर, संजना मराठे.

सदर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा – ७७५६८५७९४५ / ७८७५१५८९२२ / ७७४५८९५६५२