रत्नागिरी ः निगडी, पुणे येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेमार्फत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या (कै.) बाबूराव जोशी गुरूकुल प्रकल्पाने घवघवीत यश संपादन केले. कोकण विभागातून समूहगान स्पर्धेत विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांक, दहा रागात दहा मनाचे श्लोक राज्यस्तरावर प्रथम क्रमांक आणि सूर्यनमस्कार राज्यस्तर दितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेच्या परीक्षणासाठी नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखालील समितीने गुरूकुलला भेट देऊन परीक्षण केले. समूहगीत गुरूकुलचे शिक्षक नितीन लिमये यांनी लिहिले होते. १० रागात १० मनाचे श्लोकही संगीत शिक्षक विजय रानडे यांनी संगीतबद्ध केले. सूर्यनमस्काराचे मार्गदर्शन गुरूकुलचे अमोल पाष्टे यांनी केले. सर्व स्पर्धा सुरळीत होण्यासाठी गुरूकुल प्रमुख किरण जोशी आणि गुरूकुलच्या सर्व तसेच शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. स्पर्धेतील यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका अपुर्वा मुरकर आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, अॅड. प्राची जोशी यांनी विशेष अभिनंदन केले.