वेंगुर्ले l प्रतिनिधी : भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले तर्फे भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले चे अध्यक्ष ॲड.श्याम गोडकर यांनी डॉ सुखदा गवंडे हिने गोवा विद्यापीठातून आयुर्वेदिक मध्ये एम.डी. परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शाल, श्रीफळ देऊन तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग भंडारी महासंघाचे अध्यक्ष श्री रमण वायनगणकर, डॉ आनंद बांदेकर, मोहन मोबारकर, सुरेश धुरी, दीपक कोचरेकर,सौ.श्रेया गवंडे, तिचे आई वडील श्री सत्यभास गवंडे, सौ गवंडे उपस्थित होते.