लांजा तालुका विडी तंबाखू व्यापारी संघटनेच्या वतीने नेत्र तज्ञ डॉक्टर सुहास देसाई यांचा सत्कार

लांजा | प्रतिनिधी : लांजा तालुका विडी तंबाखू व्यापारी संघटनेच्या वतीने येथील नेत्रतज्ञ डॉक्टर सुहास देसाई यांचा नुकताच शा, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
नेत्रतज्ञ म्हणून काम करत असताना डॉक्टर सुहास देसाई यांनी अनेक प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. शेकडो लोकांच्या गेलेल्या दृष्टी पुन्हा त्यांना देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांवर अनेकदा मोफत उपचार करून त्यांनी दृष्टी परत मिळून दिलेली आहे. यामुळे गोरगरीब लोकांसाठी ते एक प्रकारे देवदूत ठरत आहेत. शासकीय सेवेत काम करत असताना आजवर हजारो गोरगरीब नेत्र रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालय, लायन्स क्लब, रोटरी क्लब, नॅब चिपळूण यांच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अन्य नेत्र उपचार केले आहेत. त्याचबरोबर आपल्या श्री स्वामी समर्थ नेत्र रुग्णालय व काही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांच्या माध्यमातून त्यांनी हजारो रुग्णांना मोफत चष्मे देखील वाटप केले आहेत.
आणि म्हणूनच त्यांच्या आजवरच्या या कार्याची दखल घेत लांजा तालुका विडी तंबाखू व्यापारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष अरुण उर्फ दादा डांगे यांनी त्यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.