आ. योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दापोली येथे शिवधनुष्य सांस्कृतिक युवा महोत्सव

दापोली | प्रतिनिधी : कोकणातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडाचे म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार योगेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दापोलीत भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आमदार योगेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना शिंदे गटाच्यावतीने दि. १८ आणि १९ फेब्रुवारी या कालावधीत दापोली शहरातील आझाद मैदान येथील शिवस्मारकासमोरील जागेत शिवधनुष्य सांस्कृतिक युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. एकेरी नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांकास ७०००, आणि स्मृतिचिन्ह, व्दितीय क्रमांकास ५००० आणि स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांकास १५०० आणि स्मृतिचिन्ह, समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांकास १५००० आणि स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांकास १०००० आणि स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांकास ७००० आणि स्मृतिचिन्ह, उत्तेजनार्थ ३००० आणि स्मृतिचिन्ह, व्यक्तिमत्व आणि सौंदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांकास ७००० आणि स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांकास ५००० आणि स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांकास ३००० आणि स्मृतिचिन्ह अशी विविध बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. इच्छुक स्पर्धकांनी दि. १६ फेबुवारीपर्यंत श्री. प्रसाद रेळेकर ९४०४१५४७४७, श्री. स्वनिल पारकर ९६६५५९२१२८, श्री. निखिल परब ९६८९८२४५०९, श्री. मंदार चोळकर ९४२२०५४२३० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बाळासाहेबांची शिवसेना दापोली शहर प्रमुख श्री. प्रसाद रेळेकर व तालुका प्रमुख उन्मेष राजे यांनी केले आहे..

दापोली विधानसभा क्षेत्राची सूत्र आमदार म्हणून योगेश कदम यांच्या हातात गेल्यानंतर अनेक महत्त्वाचे प्रश्न महत्त्वाचे काम आमदार योगेश कदम यांनी मार्गी लावली आहेत. दापोली शहरातील अश्वारूढ श्री शिवछत्रपती महाराजांचा पुतळा व चौकात शुशोभीकरण हा महत्त्वाचा प्रश्न आमदार योगेश कदम त्यांनी अवघ्या दोन वर्षात मार्गी लावला. तत्कालीन नगर विकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या सहकार्याने आमदार योगेश कदम यांनी हा प्रश्न मार्गी लावला आहे तसेच आंजर्ले खाडीत  54 कोटीची ग्रीव्हन्स पद्धतीचा मंजूर झाला असून याचाही भूमिपूजन केल जाणार आहे.  खेड येथे रोजगार उपलब्ध उपलब्ध व्हावा येथील भाजीपाल्याला उत्तम मार्केट मिळावे तो एक्सपोर्टही करता यावा यासाठी महत्त्वाचा प्रोजेक्ट खेड येथे पणन मंडळाच्या माध्यमातून उभा करण्यात आला आहे.  दरम्यान आता लवकरच दापोली तालुक्यात मत्स्य व्यवसायाशी संबंधित असलेला मोठा उद्योग येऊ घातला आहे त्यामुळे तालुक्यात मोठा रोजगार निर्माण होणार आहे त्यामुळे येथील रोजगाराला चालना मिळणार आहे अशी माहिती दोन दिवसापूर्वी आमदार योगेश कदम यांनी दापोलीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

आमदार योगेश कदम यांनी आजवर केलेल्या दापोली विधानसभा क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन तसेच त्यांच्याकडून कार्यकर्त्यांचा खेळणारा सन्मान सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची हातोडी यामुळे आमदार योगेश कदम हे कार्यकर्त्यांच्या मनातील आता लाडके दादा आहेत. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्या भव्य वाढदिवसाच्या आयोजन दापोली येथे करण्यात आल आहे अशी प्रतिक्रिया बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे दापोली विधानसभाक्षेत्र प्रमुख प्रदीप सुर्वे यांनी दिली