राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांचा सहकारमंत्री ना.अतुल सावे यांचे हस्ते सिन्नर येथे सत्कार

Google search engine
Google search engine

रत्नागिरी | प्रतिनिधी : राज्य पतसंस्थेचा फेडरशेन चे कार्याध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांना नाशिक पतसंस्था फेडरेशन चे सिन्नर येथे सत्कार कार्यक्रमासाठी व व्याख्यानासाठी आमंत्रीत केले हो.ते सिन्नर येथिल नाटयगृहात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांचे हस्ते ॲड.दीपक पटवर्धन यांचा सत्कार करण्यात आला यावेळी खासदार श्री.गोडसे हे ही उपस्थित होते. नाशिक जिल्हयातील अनेक पतसंस्था प्रतिनिधीं समोर केंद्रीय अर्थसंकल्पातील सहकार क्षेत्रासाठीच्या तरतूदी यावर ॲड.दीपक पटवर्धन यांचे व्याख्यान झाले. यामध्ये सहकारी संस्थांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कोणत्या तरतूदी करण्यात आल्या आहेत याचे सविस्तर विवेचन मोठया संख्येने उपस्थित असलेल्या पतसंस्थांचे प्रतिनिधींसमोर पटवर्धन यांनी केले. यावेळी सहकारमंत्री अतुल सावे यांनीही श्री पटवर्धन यांना कार्याध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या.