दुकानवाड-शिवापूर रस्त्याचे भूमिपजन व दुकानवाड उपवडे पुलाचे झाले लोकार्पण

पालकमंत्री रवींद्र चव्हाण,भाजप नेते निवडणूक प्रमुख निलेश राणे यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम

४ कोटी १५ लक्ष रुपयांचा दिला विकास निधी

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील दुकानवाड उपवडे येथील मोठया पुलाचे लोकार्पण व दुकानवाड -शिवापूर रस्त्याचा भूमिपून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि भाजप नेते व कुडाळ,मालवण विधानसभा निवडणूक प्रमुख निलेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

आज या मार्गावरील दुकानवाड ते शिवापूर या टप्याच डांबरीकरणं तर याच मार्गावर उपवडे येथिल कर्ली नदीवरील उंच पातळीच्या पुलाचा शुभारंभ आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रवींद्रजी चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, यांच्या उपस्थितीत पार पडला. एकूण ४ कोटी १५ लक्ष एवढा निधी खर्चुन होत असलेल्या या विकासकामांच्या शुभारंभ करण्यात आला.

माणगाव खोऱ्याला जोडण्यात येणाऱ्या कणकवली – कनेडी कुपवडे कडावल वाडोस शिवापूर शिरशिंगे सह्याद्री राज्य मार्ग १९० हा महत्वाची भूमिका बजावतो. एकून ११२ की.मी. लांबी असलेला हा महामार्ग कुडाळ तालुक्यातील ५० पेक्षा जास्त गावांच्या दळणवळणात महत्वाची भूमिका बजावणारा आहे.

यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष श्री. रणजित देसाई, प्रकाश मोरये, राजू राऊळ,संध्या तेरसे, दीपलक्ष्मी पडते, भाजपा कुडाळ मंडल अध्यक्ष श्री. संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल,माजी सभापती मोहन सावंत,ज्येष्ठ पदाधिकारी दादा बेळणेकर,तालुका उपाध्यक्ष राजा धुरी, भाई बेळनणेकर, पप्या तवटे ,दिलीप सावंत, सरपंच दीप्ती सावंत, सरपंच संजना म्हाडगुत, उपसरपंच संजय म्हाडगूत, सरपंच सुरज कदम, संदीप माडगूत शिवापुर सरपंच श्री. शेडगे, बंड्या सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.