कोकणातील रिफायनरी व सी वर्ल्ड प्रकल्प मार्गी लागणार: केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा

कुडाळ | प्रतिनिधी

कोकणातील रिफायनरी प्रकल्प असो किंवा सी वर्ल्ड प्रकल्प हे दोन्ही प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने रखडवले होते मात्र आता राज्य आणि केंद्रात आमची सत्ता असल्यामुळे हे दोन्ही प्रकल्प मार्गी लागतील असे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेमध्ये सांगून लोकसभा प्रवास योजना या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दौरा करून अनेक समस्या नागरिकांच्या ऐकून घेतल्या आणि योजनांबद्दल सुद्धा माहिती दिली असेही त्यांनी यावेळी सांगितले

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचा सिंधुदुर्ग दौरा झाला भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत हा दौरा झाला असून यासंदर्भात कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे बैठक झाली या बैठकीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लोकसभा प्रवास योजनेचे समन्वयक व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी सांगितले की, लोकसभा प्रवास योजनेतून भाजप सरकार राबवत असलेल्या योजना तळागाळापर्यंत कशाप्रकारे पोहोचतात याची माहिती घेण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आर्थिकस्तर उंचावण्यासाठी या योजनांमध्ये काही बदल करून लोकांच्या जनतेच्या असलेल्या समस्या ऐकून घेण्यात आल्या असे त्यांनी यावेळी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विकासासाठी आवश्यक असणा-या योजना कशाप्रकारे पुढील काळात तयार केल्या जाव्यात याचाही आढावा घेण्यात आला असे पत्रकार परिषदेत सांगितले.

रिफायनरी व सी वर्ल्ड प्रकल्प होणार
यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी सांगितले की, कोकणामध्ये रिफायनरी प्रकल्प व सी वर्ल्ड हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. महाविकास आघाडीने हे दोन्ही प्रकल्प रखडवले होते. मात्र आता या ठिकाणी राज्य सरकार शिवसेना व भाजप युतीचे असल्यामुळे हे दोन्ही प्रकल्प मार्गी लागतील. आणि त्या अनुषंगाने वाटचाल सुरू आहे. असे गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी सांगितले.