बुधवळे कृषी फलोत्पादन सहकारी संघ निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय

 

माजी खासदार निलेश राणे यांचे मार्गदर्शन : तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : बुधवळे कृषी फलोतत्पादन सोसायटी निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय संपादन केला. भाजपचे आठही उमेदवार विजयी झाले. भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपसभापती राजू परुळेकर व सहकारी यांच्या माध्यमातून भाजपचा विजय निश्चित झाला. असे सांगत तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

विजयी उमेदवार गुरूदास घाडी, राजेंद्र मुणगेकर, विश्वास हिर्लेकर, भानुदास येरम, सुभाष कदम, विनया पांगे, सुनंदा घाडी, सुधाकर शिरसेकर यासह बाबू कदम सचिन हडकर उपस्थित होते.

या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांसाह विद्यमान ग्रामपंचायत सदस्याचा पराभव झाला. निवडणूक अधिकारी म्हणून अजय हिर्लेकर यांनी काम पहिले.