भाजप शिरोडा शहर यांचा पाठपुरा : शिरोडा व्यापारी संघटनेकडे धनादेश सपूर्त
वेंगुर्ले : प्रतिनिधी
शिरोडा बाजारपेठ येथे अचानक आग लागून व्यापाऱ्याचे मोठे नुकसान झाले. यांना मदत मिळावी म्हणून सर्व बाजारपेठ बंद ठेऊन श्री माऊली सभागृह येथे शिरोडा पंचक्रोशी तील व्यापारी व ग्रामस्थ,व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये शिरोडा व्यापारी संघटनेकडे उपस्थित असलेल्या व्यापारी व ग्रामस्थांकडून आर्थिक मदत जमा झाली. यावेळी भाजप शिरोडा शहर यांच्याकडून पाठपुरावा केल्यामुळे विशाल सेवा फाऊडेशन कडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत व त्यांच बरोबर प्रत्येक उपस्थित भाजप, पदाधिकारी यांनी आपली व्यक्तीगत आर्थिक मदत शिरोडा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजन शिरोडकर यांच्याकडे सपूर्त केली.
या वेळी भाजप, रेडी जि. प. सदस्य प्रितेश राऊळ, भाजप, वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, शिरोडा ग्रामपंचायत माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी,उपसरपंच राहुल गावडे, भाजप,शिरोडा ग्रामपंचायत सदस्य मयूरेश शिरोडकर, सौ.हेतल राहुल गावडे, कु अर्चना अनिल नाईक, भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी, उपाध्यक्ष संतोष अणसूरकर, भाजप शिरोडा शहर ज्येष्ठ पदाधिकारी अनिल गावडे, चंद्रशेखर गोडकर, भाजप रेडी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच सौ. नमिता नागोळकर, भाजप, आरवली ग्रामपंचायत सरपंच तातोबा कुडव, उपसरपंच सौ रिमा मेस्त्री भाजप, शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख विदयाधर धानजी उपस्थित होते.
काल शिरोडा बाजारपेठ मधील आग विझविण्यासाठी शिरोडा, आरवली, रेडी, भाजप कार्यकर्ते हिर हिरीने पुढे होते त्यामध्ये आवर्जून मयूरेश शिरोडकर, मनोज उगवेकर, अमित गावडे, राहुल गावडे, संतोष अणसूरकर, समीर कांबळी, प्रितेश राऊळ तसेच अन्य पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली
तरी आजच्या सभेमध्ये भाजप रेडी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ यांनी शासन स्तरावर नुकसान मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.