कोमसाप आयोजित निबंध स्पर्धेत जान्हवी दाभोलकर व गौरवी कोठावळे प्रथम

Google search engine
Google search engine

तुतारी कवी संमेलनात होणार बक्षीस वितरण

सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत पहिला गट इयत्ता पाचवी ते सातवी गटात  जान्हवी नंदकुमार दाभोलकर तर दुसऱ्या इयत्ता आठवी ते दहावी गटात  गौरवी आनंद कोठावळे इन्सुली हायस्कूल यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सोमवारी तुतारी कवी संमेलन कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांचे पारितोषिक वितरण होणार आहे. अमोल  टेमकर यांनी आपल्या मातोश्री कै. मंदा मंगेश टेमकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पुरस्कृत केली होती.

या स्पर्धेत पहिल्या गटात इयत्ता पाचवी ते सातवी द्वितीय कोमल अरविंद पास्ते कलंबिस्त हायस्कूल, तृतीय कस्तुरी हरिश्चंद्र आसयेकर मळगाव हायस्कूल, उत्तेजनार्थ कृष्णा महेश पास्ते सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूल, आरती अजय कोठावळे इन्सुली हायस्कूल तर दुसऱ्या गटात इयत्ता आठवी ते दहावी द्वितीय संचित संजीव पालकर कलंबिस्त हायस्कूल, तृतीय मयुरी महेश कारीवडेकर कारिवडे हायस्कूल, उत्तेजनार्थ अमृता अरविंद पास्ते कलंबिस्त हायस्कूल, दिव्य अनिल कोठावळे इन्सुली हायस्कूल या विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
या स्पर्धकांच्या निबंधाचे परीक्षण प्रज्ञा मातोंडकर, आदिती अमित सामंत, किशोर नांदिवडेकर ,सौ. ऋतुजा सावंत भोसले यांनी केले. या सर्व विजेत्या स्पर्धकांनी व शिक्षकांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमाला तुतारी संमेलन स्थळी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष अँड संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी केले आहे.