हजरत पीर याकुब बाबा सरवरी उटंबर केळशीच्या उर्सचे आयोजन

Google search engine
Google search engine

दापोली | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु याकूब बाबा यांच्या ३४३ वा वार्षिक उर्सचे २७ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरा करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री, महाराष्ट्र शासन व कार्यध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश आरिफ खान, आमदार योगेश कदम, महाराष्ट्र शासन वक्फ बोर्ड मेंबर डॉ. मुदस्सर लांबे, माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते व महाराष्ट्र राज्य माजी पं.स. सदस्य (दर्गा ट्रस्ट सल्लागार) मुजीब रुमाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

उर्स निमित्त रात्रौ ७ ते १० वा. नियाज (स्नेहभोजन) रात्रौ १० वा. सत्कार समारंभ व आभार प्रदर्शन, रात्रौ ११ वा. मशहुर कव्वाल गुलाम हबीब, छत्तीसगड यांच्या कव्वालीचा मध्यरात्री ३ वा. संदल मिरवणूक आदी कार्यक्रम पार पडणार आहेत.

तरी त्यानिमित्ताने सर्व हिंदु-मुस्लिम बांधवानी या उर्साच्या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष दर्गा खादीम मकबुल दिनवारे, सचिव जहुर झोंबडकर यांनी केले आहे