रत्नागिरी : बालेवाडी क्रीडा संकुल पुणे येथे तायक्वॉडो असोसिएशन महाराष्ट्र मुंबई यांच्या मान्यतेने फायटर्स तायक्वॉदो अँकाडमी पुणे द्धारा आयोजित ३३ वी महाराष्ट्र राज सब-ज्युनियर क्योरुगी व ९ वी महाराष्ट्र राज सब-ज्युनियर पुमसे तायक्वॉडो अजिक्यंपद स्पर्धत अतिशय उस्फूत वातावरणात पार पडली. महाराष्ट्रातील ३० जिल्हामधून ७५० हुन अधिक खेळाडूनी क्योरुगी व पुमसे प्रकारात सहभाग नोंदवला.
राज्यस्तरीय तायक्वॉडो स्पर्धत गणराज तायक्वॉडो क्लबची रत्नागिरीची सुरभी तेजश्री राजेंद्र पाटील राज्यस्तरीय तायक्यॉडो स्पर्धत १२ वर्ष मुली, वजनी गट १८ किलो खालील, गटात सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. सुरभीची छत्तीसगड रायपूर येथे दिनांक ०१ फेब्रुवारी ते ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या ३७ वी राष्ट्रीय सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्ध साठी सुरभीची निवड झाली आहे. सुरभीने आजपर्यंत जिल्हास्तरीय ४ सुवर्ण पदक आणि राज्यस्तरीय ३ सुवर्ण पदक व राष्ट्रीय स्पर्धात १ कांस्य पदक अशा विविध स्पर्धेत विशेष सुरभीने यश संपादन केले आहे. सुरभीला गणराज तायक्वॉदो क्लब मध्ये वयाच्या ५ वर्षा पासून गणराज तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक व अध्यक्ष श्री प्रशांत मनोज मकवाना व महिला प्रमुख प्रशिक्षक सौ.आराध्या मकवाना यांच्या कडे प्रशिक्षण घेत आहे. सुरभी ही पोतदार शाळेची विद्यार्थिनी असून ती सध्या ४ थी मध्ये शिकत आहे.सुरभीला तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाराजगे, सेक्रेटरी मिलिंद पाठारे, खजिनदार व्यंकटेशराव करा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, तालुकाध्यक्ष राम करा, सचिव शाहरुख शेख, उपाध्यक्ष मिलिंद भागवत, कोषाध्यक्ष प्रशांत मकवांना, गणराज तायक्वांदो क्लबचे उपाध्यक्ष अभिजित विलणकर, सचिव रंजना मोडूळा, कोषाध्यक्ष नेहा किर, साक्षी मयेकर, कनिष्का शेरे, यशंवत शेलार, पुजा कवितके, अनिकेत पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.











