संत निरंकारी मिशनच्या २१० स्वयंसेवक यांनी केली स्वच्छता, गुहागर नगराध्यक्ष यांच्यासह अनेकांनी केले कौतुक
पाटपन्हाळे (वार्ताहर) संत निरंकारी मिशनमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल,स्वच्छ मन’ अभियान गुहागर समुद्र किनारा येथे “जल संरक्षण’ आणि ‘जल बचाव उपक्रम राबविण्यात आले . हा परियोजनेचा मुख्य उद्देश होता यामध्ये जलाशयांची स्वच्छता आणि स्थानिक जनतेमध्ये जागृती अभियान राबवून जनसामान्यांना प्रोत्साहित करण्यात आले. सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी यांनी आपल्या कार्यकालात समाज कल्याणाचे अनेक उपक्रम राबवले. त्यामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान, रक्तदान आदी उपक्रम घेण्यात त्यांच्याच शिकवणूकीतून प्रेरणा घेत दरवर्षी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशनानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून यावर्षी अमृत परियोजनेचे आयोजन करण्यात आले आहे.या परियोजनेअंतर्गत निरंकारी मिशनचे स्वयंसेवक समुद्रकिनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहीरी, झरे, पाण्याच्या टाक्या, नाले आणि जलप्रवाह इत्यादिंची स्वच्छता करुन ते निर्मळ बनवित आहेत तसेच जल संरक्षणाची प्रेरणा देत आहेत प्राकृतिक जलाशय असोत किंवा मानवनिर्मित, सर्वच क्षेत्रांसाठी हा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण आहे. गुहागर समुद्रकिनारी “स्वच्छ जल स्वच्छ मन”‘अभियान राबविण्यात आले आहे. गुहागर समुद्र किनारा आज चकाचक झाला आहे. सर्व कचऱ्याचे वर्गी करण करण्यात आले.यावेळी हजारो रिकाम्या दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक, कचरा, गवत असे जमा करून नगर पंचायतीच्या मालकीच्या जागेत जमा करण्यात आला. या अभियानात गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, पत्रकार गणेश किर्वे आदींसह तळवली शाखा मुखी दत्तात्रय किंजळे, क्षेत्रीय संचालक उमेश भागडे, युनिट संचालक चंद्रकांत कुळे, दत्तकुमार शिगवण, शरद यादव, संदेश कोंडविलकर व तालुक्यातील साध संगत सह सेवा दल महिला पुरुष आदी सहभागी झाले होते.