सिंधुदुर्ग जिल्हा नररत्नांची खाण : वि. ना. लांडगे

Google search engine
Google search engine

मराठी भाषा दिनानिमित्त मराठी शिक्षक सन्मान व विद्यार्थी गुणगौरव सोहळा

ना. दीपक केसरकर मित्रमंडळ व सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाचे आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्हा नररत्नांची खाण आहे. या भूमीने सर्व क्षेत्रात नररत्ने दिली आहेत. तसेच शैक्षणिक दृष्ट्या सिंधुदुर्ग राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्याचे सुपुत्र शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर संयमी व्यक्तीमत्व असून सर्वांना बरोबर घेऊन कार्यरत आहेत. त्यांनी मराठी भाषेला समृद्धी मिळावी म्हणून प्रयत्न चालवला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अध्यापक संघाचे अध्यक्ष वि. ना. लांडगे यांनी केले.
ना. दीपक केसरकर मित्रमंडळ व सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ आयोजित मराठी भाषा दिनानिमित्त मराठी शिक्षक सन्मान व विद्यार्थी गुणगौरव सोहळा काझी शहाबुद्दीन हाॅलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने वि. ना. लांडगे यांनी उद्घाटन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी सभापती अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे, अध्यापक संघाचे कार्यकारी अध्यक्ष भरत गावडे, ज्ञानदीप शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक, विकास गोवेकर, प्राचार्य गोविंद काजरेकर, प्रदीप शिंदे, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, नंदू गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी वि. ना. लांडगे म्हणाले, समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी ठरत. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न केला. त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार ज्ञानगंगेला अर्पण केला. मराठी अध्यापक संघाच्या वतीने राज्यात आपण दौरा करत असताना शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर नवीन शैक्षणिक धोरण सर्वांना विश्वासात घेऊन आणत आहेत. ते संयमी व्यक्तीमत्व असून सर्वांना बरोबर घेऊन कार्यरत आहेत.
कुसुमाग्रजांच्या साहित्याचा गौरव केला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रांची खाण आहे. कुसुमाग्रजांच्या कविता, साहित्य अभ्यासले पाहिजे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करण्यामागची तपश्चर्या महत्त्वाची आहे. आध्यात्म,भूगोल, इतिहास अशा प्रत्येक क्षेत्रातील माहिती असेल तर आपण चांगले ज्ञानदान करू शकतो. सामाजिक भावनेतून भरत गावडे, सहकारी चांगले काम करत आहेत.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी म्हणाले, मराठी भाषेला चांगले स्थान निर्माण व्हावे, म्हणून शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर प्रयत्नशील आहेत. अध्यापक संघाने कार्यक्रम आयोजित करून सत्कार, गुणगौरव सोहळा आयोजित केला. त्याला धन्यवाद देतो. मंत्री महोदयांनी शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त केला आहे. शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे म्हणाले, समाजात शिक्षण आणि शिक्षकांचे स्थान सर्वोच्च स्थान आहे. गुरू, शिष्य म्हणूनही मोठा वाटा आहे. शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी मराठी भाषा सातासमुद्रापार भरारी घेईल, अशी अंमलबजावणी सुरू केली आहे. मराठी भाषेतून शिक्षण मिळावे, म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत.
प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर व भरत गावडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. भरत गावडे म्हणाले, शिक्षण,मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर मंत्रीपदाला न्याय देत आहेत. त्यांनी मराठी भाषा दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्री महोदय येणार होते पण विधिमंडळ अधिवेशन सुरू झाले आहे. त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. ज्ञानदान करणारे ३५ शिक्षक सेवानिवृत्त झाले. त्यांचे कौतुक, पुरस्कार विजेते आणि विद्यार्थ्यांच्या गुणगौरव करण्यात येत आहे. मराठी भाषा समृद्ध झाली पाहिजे, म्हणून मंत्री केसरकर यांनी सातत्याने प्रयत्न करुयात, असा संदेश दिला आहे.
यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यात वि. ना. लांडगे, डॉ. गोविंद काजरेकर आदींचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य अध्यापक संघाच्या वतीने निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्याला प्रथम क्रमांक सौ. विशाखा पालव – इन्सुली हायस्कूल तर द्वितीय क्रमांक प्रा. सुषमा मांजरेकर यांनी पटकावला. त्यांचा गौरव करण्यात आला.सूत्रसंचलन विशाखा पालव यांनी केले.

आरोस विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर यांचा गौरव

मराठी भाषा समृद्धीसाठी अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल व मराठी अध्यापक संघाच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल आरोस विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर यांचा गौरव करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ व दीपकभाई केसरकर मित्रमंडळातर्फे आयोजित मराठी शिक्षक सन्मान सोहळ्यात मराठी अध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष वी.ना. लांडगे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
काझी शहाबुद्दीन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मराठी अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष भरत गावडे, माजी सभापती अशोक दळवी, बांदा कॉलेज प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, माजी मुख्याध्यापक प्रदीप शिंदे, विकास गोवेकर, वाय. पी. नाईक, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, नंदू गावडे आदी उपस्थित होते.