सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून द्या

Google search engine
Google search engine

माजगांववासियांचे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना निवेदन  

सावंतवाडी । प्रतिनिधी : माजगाव गावात सांडपाणी घनकचरा व प्लास्टिक कचऱ्याची समस्या वाढत असून ती समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायत माजगावच्या सांडपाणी घनकचरा व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेल्या जमिनीपैकी १० गुंठे जागा ग्रामपंचायत माजगावला मिळावी अशी मागणी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, उपसरपंच बाळा वेजरे, भाजप किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत यांनी केली आहे.

माजगाव ग्रामपंचायतीची आज रोजीची अंदाजे लोकसंख्या २०१६० पेक्षा अधिक असून माजगाव गावात नागरीकरण व शहरीकरण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे माजगाव गावात सांडपाणी, घनकचरा व प्लास्टिक कचऱ्याची समस्या वाढत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने सांडपाणी व घनकचरा प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर केलेला असून या प्रस्तावास तांत्रिक मान्यता मिळालेली आहे.

परंतु या प्रकल्पासाठी लोकवस्तीपासून दूर अंतरावर आवश्यक जमिन ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामपंचायत माजगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र सरकारच्या नावे असलेल्या जमिनीपैकी १० गुंठे जागा ग्रामपंचायत माजगावच्या सांडपाणी घनकचरा व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्पासाठी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना सादर करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा सदस्या रेश्मा सावंत, उपसरपंच बाळा वेजरे, भाजप किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत आदी उपस्थित होते.