नवी मुंबई : खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ लोकलचे डबे घसरले

Google search engine
Google search engine

नवी मुंबई : हार्बर मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकात येत असलेल्या लोकल ट्रेनचे तीन डबे रुळावरुन घसरले आहेत. यामुळे खारकोपर ते नेरुळ लोकल सेवा ठप्प झाली आहे. ही घटना आज सकाळी ८ वाजून ४५ मिनीटांच्या सुमारास घडली.सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. दुर्घटनेच्या ठिकाणी रेल्वे कर्मचारी पोहचले असून लोकलचे डबे पूर्ववत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झाले आहेत.