कलमठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम.

Google search engine
Google search engine

ग्रामपंचायत मासिक बैठकीत शाळेच्या विद्यार्थ्यांना केले सहभागी.

“बालस्नेही गाव” संकल्प अंतर्गत उपक्रम : विद्यार्थ्यां मध्ये समाधान

कलमठ : ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत कलमठ गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांना निमंत्रित करून ग्रामपंचायत कामकाज कसे चालते याची माहिती मिळावी यासाठी सरपंच संदिप मेस्त्री यांच्या संकल्पनेतून कलमठ गावातील विद्यार्थ्यांना निमंत्रित करून सहभागी करून घेतले. ३ तास चाललेल्या बैठकीच्या आयत्यावेळच्या विषयात चर्चे दरम्यान विद्यार्थ्यांनि अनेक शंका व अनेक प्रश्न विचारुन ग्रामपंचायत कामकाजाची माहिती करून घेतली, कलमठ ग्रामपंचायतने स्विकारलेल्या बालस्नेही व महिलास्नेही संकल्पां मधून आज गावातील विद्यार्थ्यांनि चर्चेत सहभाग घेताना बैठकीचा आनंद घेतला. ग्रामपंचायत कामकाज कस चालत? कोरम म्हणजे क़ाय? मासिक बैठक का आयोजित केले जाते? अजेंडा म्हणजे क़ाय? इतिवृत्त म्हणजे क़ाय? विकासकाम साठि निधि कुठून येतो? ठराव म्हणजे क़ाय?
अश्या अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनि उपस्थित केले व बैठकीत सहभागी करून घेतल्या बद्दल आनंद व्यक्त केला. सरपंच संदिप मेस्त्री व ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे सहज आणी सोप्या भाषेत दिली. या बैठकीला उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, सदस्य रविंद्र यादव, प्रीति मेस्त्री, दिनेश गोठनकर,अनुप वारंग, नितिन पवार,स्वाति नारकर,सुप्रिया मेस्त्री, हेलन कांबळे, इफत शेख, श्रेयश चिंदरकर,तनिष्का लोकरे,सचिन खोचरे, प्रियाली आचरेकर, नजराना शेख उपस्थित होते. पुढच्या बैठकां मध्ये “महिला स्नेही” संकल्प मधून महिला ग्रामसंघ व बचटगट प्रतिनिधि यांना मासिक बैठकी मध्ये सहभागी करून घेणार असल्याचे सरपंच संदिप मेस्त्री म्हणाले.