संगणक परिचालकांचे बेमुदत काम बंद आंदोलन ; कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्या

Google search engine
Google search engine

 

वैभववाडी प्रतिनिधी
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा देऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात १ मार्च २०२३ रोजी आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
तसेच या मागणीसाठी २७ फेब्रुवारी पासून मागणी मान्य होईपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतलेला आहे. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी वैभववाडी जयप्रकाश परब यांना वैभववाडी तालुका संगणक परिचालक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा वैभववाडी यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी वैभववाडी अध्यक्ष उदय फोंडके, श्रध्दा सावंत, स्नेहा वायंगणकर, रुपेश कांबळे, तुषार हडशी, तुषार शिंगरे,अभय कांबळे,वैष्णवी नकाशे, रुपाली रावराणे, महेश दळवी, प्रशांत पांचाळ, सोनम वाळवडकर, संगीता सुतार, नीलम पेडणेकर, जयराज हरयाण, योगेश पवार, राशिदा ठाणगे, मैथिली पाटील, प्राची रावराणे, बबन पवार, दिव्या पाटील,भाग्यश्री आम्रस्कर आदी संगणक परिचालक उपस्थित होते.