वैभववाडी | प्रतिनिधी
भुईबावडा बाजारपेठ येथे प्रवीण पांडुरंग शिनगारे वय ३० रा. तिरवडे तर्फ खारेपाटण याला गोवा बनावटीच्या ९ हजार रुपयाच्या दारुसह रंगेहाथ पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेशन ओरोस यांनी केली.
भुईबावडा बाजारपेठेत प्रवीण शिनगारे हा गोवा बनावटीची दारु विकत असल्याची माहीती स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाला मिळाली होती. त्यानुसार स्थानीक गुन्हे अन्वेशनचे हेड काॕ. राजू जामसंडेकर, रवि इंगळे यांनी वैभववाडी पोलिस ठाणेचे पो.काॕ.पवार यांना सोबत घेऊन भुईबावडा येथे गेले. यावेळी सदर इसम बाजारपेठेत सापडला. त्याच्या हातात असलेल्या पिशवीत गोवा बनावटीच्या १८० मि.ली. च्या ९५ बाॕटल प्रत्येकी १००.रुपये किंमतीच्या एकूण ९.हजार ५०० रुपयांची दारु जप्त केली. त्याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.