तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात उतरून आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी

उद्योजक संदिप गणपत दळवी

मोडकाआगर l वार्ताहर :सध्या बेरोजगारीचे प्रमाण अधिक वाढत आहे.नोकरी मिळणेही कठीण होत चालले आहे.तरी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता छोट्या मोठ्या व्यवसायात उतरून आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी असे आवाहन जानवळे गावाचे सुपुत्र व उद्योजक म्हणुन ओळख असणारे संदीप गणपत दळवी यांनी केले आहे. ते एका कार्यक्रमानिमित्त आपल्या जानवळे गावी आले होते. त्याची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करतांना त्यांनी आपले मत व्यक्त केले.जानवळे गावचे रहिवासी व सध्या व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्य असणारे उद्योजक संदिप दळवी यांचा मुंबई येथे टी-शर्ट मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय आहे . त्यानी टी-शर्ट मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायात उंच भरारी घेतली असून

तरुणांना उद्योजक संदीप दळवी यांच्याकडून नक्कीच प्रेरणा घेण्यासारखी आहे .उद्योजक संदिप गणपत दळवी यांनी पुढें सांगितले की, माझा जन्म जानवळे या गावी झाला आहे. शिक्षण गावीच म्हणजे पहिली ते सातवी हे गावच्या शाळेमध्ये झाले आहे आणि आठवी ते दहावी श्रृंगारतळी येथील न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे आणि पुढील बारावी पर्यंत शिक्षणं श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्या मंदीर व उच्च माध्यमिक विद्यालय, गुहागर येथे केले आहे .शेतकरी कुटुंबात जन्माल आलो. मुंबई या ठिकाणी आपला स्वतःचं घर नसताना मागील दहा वर्ष अतोनात प्रयत्न करून आपला स्वतःचा व्यवसाय सुरुवात केला.आज खूप मोठी उंच भरारी मारली आहे. स्वतःचा टी-शर्ट मॅन्युफॅक्चरिंग असा व्यवसाय आहे. माझ्याकडे आज ४० ते ५० कामगार काम करत आहेत. माझा एकच ध्येय आहे माझ्याकडे जे चाळीस ते पन्नास कामगार काम करतात त्यांचं कुटुंब आनंदात आपल्या व्यवसायावर जगत राहतील हेच माझे ध्येय आहे आज मी इंडियन प्रीमियर लीग यासारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये टी-शर्ट सप्लाय करत आहे. मुंबई इंडियन्स यासारख्या संघाला मागील दहा वर्ष टी-शर्ट सप्लाय करत आहे आणि मागील चार वर्ष साऊथ आफ्रिका आणि दुबई या ठिकाणी एक्सपोर्ट करत आहे आज मुंबईमध्ये उत्तम व्यवसाय करणारे अशी व्यक्ती म्हणुन माझी ओळख झालेली आहे .आपला परिवार, आपला गाव , आपला समाज, यांना व्यवसायात कसे घेता येईल किंवा त्यांना मार्गदर्शन कसे करता येईल हा माझा मोठा प्रयत्न आहे.गावामध्ये, समाजामध्ये समाजकार्यासाठी खूप मोठा भाग मी घेत असून समाजाला आणि गावाला पुढे कसे घेऊन जाता येईल यासाठी माझा सततचा प्रयत्न असतो.

मुंबईमध्ये असणारे अपंग मुले यांच्या शाळेमध्ये जाऊन माझ्या व्यवसायातील मोफत गणवेश देण्याचे काम मी करतं असतो.यातून त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळत असते.मुंबईमध्ये नॅशनल पार्क येथे असणारी आदिवासींची वस्ती या ठिकाणी असणारी गरीब मुले यांना शालेय गणवेश मी देत असतो. हे सर्व सेवाभावी काम माझ्या हातून होत आहे हे माझं भाग्य आहे. माझ्या कुटुंबामध्ये तसे कोणी व्यवसाय करत नसताना सुद्धा व्यवसायाचा अभ्यास करून हा व्यवसाय एवढा मोठ्या थरावर घेऊन गेलो आहे . याचा मला सार्थ अभिमान आहे.मला सन २०२३ मध्ये समाज पुरस्कार देण्यात आला होता आणि मुंबईमध्ये खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडून मी करतं असलेल्या सामाजिक कामाबद्दल माझा सत्कार करण्यात आला होता. एकंदरीत सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील असणारा मी आज व्यवसायात उतरुन मी माझी आथिर्क परिस्थिती सुधारली असून तरुणांनी सुध्दा अशीच प्रगती करावी असे आवाहन त्यांनी शेवटी केले.