मारहाण प्रकरणातील देवबाग येथील आरोपीस मालवण न्यायालयाने ठरवले दोषी

Google search engine
Google search engine

सहाय्यक सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांनी पाहिले काम

मालवण | प्रतिनिधी : देवबाग येथे गाडी पार्क केल्याच्या विषयावरून झालेल्या वादानंतर झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपी हालेस कैतान डिसोजा (रा. देवबाग) याला मालवण न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरवत शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांनी काम पाहिले.

 

गुन्ह्याची घटना देवबाग येथे गतवर्षी २७ एप्रिल रोजी घडली होती. प्राप्त तक्रारीनुसार मालवण पोलीस ठाण्यात भादवी कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ अन्वये हालेस कैतान डिसोजा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष शिवगण व डी. व्ही. जानकर यांनी तपास केला. या प्रकरणी मालवण न्यायलायने आरोपी हालेस याला दोषी (इच्छापूर्वक दुखापत पोहोचवल्या प्रकरणी दोषी) ठरवून शिक्षा सुनावली आहे. मालवण पोलीस ठाण्याचे न्यायालयीन पोलीस कर्मचारी एस एस करंगुटकर यांनी याबाबत माहिती दिली.