तोंडवळी वरची शाळेत भरली विज्ञान जत्रा

वैज्ञानिक प्रतिकृतीतून मुलांनी दिला वैज्ञानिक संदेश

आचरा | अर्जुन बापर्डेकर : राष्ट्रीय विज्ञान दिवस या दिवसाचे औचित्य साधत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तोंडवळी वरची या शाळेने शालेय स्तरावर विज्ञान जत्रेचे आयोजन केले होते .शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी .घडलेल्या घटने संदर्भात त्या घटनेची कारण मीमांसा जाणून घेत त्यांच्या मध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी,जे दिसते ते असेच का? हे उलगडून पाहता यावे यासाठी या जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित छोटे छोटे प्रयोग सादर करून व त्या प्रयोगात मागील शास्त्रीय कारण स्पष्ट करून उपस्थितांना यातून संदेश देत विज्ञान जत्रेचा हेतू सफल केला. तसेच विज्ञानाची दृष्टी वापरा ही अंधश्रद्धा निर्मूलन करणारी छोटीशी नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केलीं. या जत्रेचे उद्घाटन तोंडवली सरपंच श्रीमती नेहा तोंडवळकर व उपसरपंच श्री. हर्षद पाटील यांनी केले या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य श्रीमती अनन्या पाटील व श्रीमती मानसी चव्हाण तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. महेश चव्हाण उपस्थित होते. अनेक ग्रामस्थांनी या प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थी अतिशय सुंदर रीतीने आपल्या साहित्याचे सादरीकरण करतात असे गौरवोद्गार श्री. वासुदेव उर्फ नाना पाटील यांनी काढले हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शितल माडये ,पदवीधर शिक्षक श्री. राजेश भिरवंडेकर ,श्री. परशुराम गुरव, श्री. रुपेश दुधे व श्री. अशोक डोंगळे यांनी परिश्रम घेतले.